आमच्याविषयी

ग्रामपंचायत सरुड

आपले सहर्ष स्वागत करते.
सरुड हे गाव कोल्हापूर रत्नागिरी महामार्गापासून ०६ कि.मी अंतरावर असून कोल्हापूर मुख्यालयापासून सुमारे ४५ कि.मी अंतरावर आहे. तसेच तालुक्याच्या मुख्यालयापासून २० कि.मी अंतरावर आहे. गाव हे वाढत्या वस्तीचे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची एकूण लोकसंख्या ७१६१ आहे. यामध्ये पुरुष संख्या ३६७९ व स्त्रिया संख्या ३४८२ असून गावात एकूण १५३० कुटुंब आहेत. गावामध्ये रस्ते व वाहतूक व्यवस्था उत्तम आहे. तसेच गावात विकास सोसायटी यांचे आर्थिक जाळे कार्यरत आहे. गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय असून यामध्ये संगणीकृत सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिली जाते. शैक्षणिक दृष्ट्या गावामध्ये प्राथमिक शाळा आहे. तसेच गावामध्ये हायस्कूल व महाविद्यालय आहे. गावाच्या पूर्व व उत्तर दिशेने वारणा नदी बारमाही वाहते तसेच गावाच्या पश्चिमेस वारणा कालवा असल्याने जलसिंचनाच्या माध्यमातून गाव समृद्ध आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने गावामधील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. भात, ऊस, मक्का हि पिके प्रामुख्याने घेतली जातात. गावामध्ये सर्व धर्माचे लोक जसे हिंदू, मुस्लिम, बौद्ध, हरिजन सर्व लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. सर्व धर्मियांचे सण एकत्र साजरे केले जातात. गावामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असणारे निनाई मंदिर देवालय सर्व धर्मियांच्या लोकांचे दृष्टीने एक प्रमुख श्रद्धास्थान आहे. असे हे गाव तालुक्यातील प्रमुख गावांपैकी एक आहे..

  • गावातील 100% विधवा महिलांना विधवा सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. हे आपल्या गावचे नावीन्यपूर्ण काम आहे
  • महिला सभा
  • प्लास्टिक बंदी जनजागृती करणे करिता दुकानदारांना नोटीस लागू करतेवेळीचे आहेत